Saturday, June 4, 2011


संक्षिप्त : काजव्यांच्या विश्वात पर्यटक हरखून गेले!Bookmark and SharePrintE-mail
राजूर, ४ जून/वार्ताहर
जिल्ह्य़ात बहुतेक ठिकाणी पावसाचे आगमन झाले असले, तरी भंडारदरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. तुरळक पाऊस असला, तरी सुट्टीचा आनंद लुटण्यास आलेल्या निसर्गप्रेमी व पर्यटकांनी रात्रीच्या अंधारात चमचमणारी काजव्यांची दुनिया पाहण्यासाठी गर्दी लोटली होती.  रात्री उशिरापर्यंत पर्यटकांचे थवे धरण परिसरात, तसेच रंधा, चिचोंडी, भंडारदरा आदी ठिकाणी थांबून होते. पाऊस सुरू झाल्यावर उडणाऱ्या काजव्यांचा लखलखाट अंधारात काही औरच भासत होता. राजूर परिसरात पावसाचे आगमन झाले असून भंडारदरा धरण परिसरात तुरळक पाऊस होता. राजूर भागात मात्र मुसळधार पावसामुळे ओढे, नाले दुथडी भरून वाहत होते. चांगल्या पावसामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते खरेदीची लगबग सुरू केली आहे.     

No comments:

Post a Comment