संक्षिप्त : भंडारदरा धरणात तरूणीचा गूढ मृत्यू |
पंधरवडय़ातील तिसरी घटना राजूर, २० जून/वार्ताहर भंडारदरा जलाशयात आज सकाळी स्थापत्य अभियंता रेश्मा कैलास भारती (वय २६) हिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. भंडारदरा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू होण्याची गेल्या १५ दिवसांतील ही तिसरी घटना आहे. संगमनेरला खासगी ठिकाणी सेवेत असणारी रेश्मा भारती घरातून रुसून बाहेर गेली. तिच्या घरच्यांनी या बाबत संगमनेरला बेपत्ता असल्याची नोंद केल्याचे समजते. आज सकाळी तिचा मृतदेह धरणाच्या वीजनिर्मिती विहिरीजवळ आढळला. तिचे वडील कैलास भारती हे घाटघरला पाटबंधारे विभागाच्या सेवेत असून, पाण्यावर तरंगणारा मृतदेह रेश्माचाच असल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक रहिवाशांनी तिच्या घरच्यांशी संपर्क साधला. मयताचा भाऊ राहुल कैलास भारती (वय २९) याने घटनास्थळी येऊन मृतदेह आपल्या बहिणीचाच असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर स्थानिक कर्मचारी बाजीराव बंदसोडे व पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी मृतदेहाच्या गळ्याभोवती काळसर डाग, जीभ बाहेर आलेली दिसून आले. या संदर्भात पोलीस कसून तपास करीत आहेत. हा घातपाताचा संशय असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रेश्माच्या पायात बूट, अंगावर सलवार कुर्ता होता. राजूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. |
very bad news
ReplyDelete